Saturday, March 12, 2022

कश्मीरी पंडित - विकिपीडिया

केवळ 'हिंदू' आहेत म्हणून 

सुमारे पाच लाख लोकं एका रात्रीत बेघर झाली...


हजारो मारली गेली...


हजारो माता-बहिणींची अब्रू लुटली गेली....


घरं/मंदीरं लुटली गेली, तोडली गेली.. पार बेचिराख झाली....


एका संपूर्ण समाजाचं अस्तित्वच रातोरात संपवलं गेलं...


--


आणि हे काही त्या चारशे-पाचशे वर्षांपूर्वीच्या 

घौरी, गझनी, अफजलखान, औरंगजेब वगैरेच्या काळात नाही हं....


 हे सगळं घडलंय

 अगदी आत्ता.. 


आपल्या 'संविधानानी' चालणाऱ्या प्राणप्रिय राष्ट्रात...


फक्त तीस-बत्तीस वर्षापूर्वी....


अगदी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यादेखत....


नी आपल्यातल्या 99.999% लोकांना साधी गंधवार्ताही नाही ह्या अमानुष नरसंहाराची...

----


*TheKashmirFiles*

  

अंगावर येणारं भयानक वास्तव...


हा पिक्चर नाहीच्चे....


त्या इतकीवर्ष दाबल्या गेलेल्या सत्याचं,  अन्यायाचं  जणू CCTV फुटेजच आहे हे...


आपल्याच मातीत, आपल्याच देशात, आपल्याच बांधवांवर झालेला हा अन्याय बघताना ज्याच्या डोळ्याच्या कडा नाही ओलावल्या तो सर्टीफाईड 'अमानवी'....


--


थिएटर मधून बाहेर पडताना

फक्त स्वतःची 'लाज' वाटते.....


बाकी काही वाटूच शकत नसतं.....


--

अरे कसलं षंढासारखं

 'भाईचारा, बंधूभाव, मानवता' चं तुणतुणं वाजवतोय आम्ही...?


काय झालं 11व्या शतकात आलेल्या तुर्कींपासून कालपरवा पर्यंत सगळ्यांशी 'भाईचारा' राखणाऱ्या सेक्यूलर काश्मीरी हिंदूचं???


आणि काय केलंन सरकारने तरी यावर?


आणि उपाय काये यावर???


अक्षरशः भंडावून सोडणारे प्रश्न आहेत हे....


कुठल्याही शष्प-पुष्प गोष्टींसाठी आंदोलनं/मोर्चे काढणारे खूप दिसतात.. 

का नाही कधी कुणीच काश्मीरी हिंदूंसाठी मोर्चा काढला??


--

असो...


पुन्हा सांगतो,

 माझा ह्या चित्रपटाशी एका फुटक्या कवडीचाही संबंध नाही... 

परंतू अधिकाधीक लोकांनी हा सिनेमा पाहावा, नी देशाच्या इतिहासातल्या नी कायमचं दाबून टाकलेल्या या काळ्याकुट्ट घटनाक्रमाचं सत्य जाणून घ्यावं, 

ह्यासाठीच हा प्रयत्न...


बाकी,

विषय ज्यांना पटेल त्यांनी निःसंदेहपणे शेअर करा अथवा अगदी काॅपी-पेस्ट करून पुढे पोहोचवा...


तेव्हा,


कळावे..


#काश्मीर_डायरीज

#काश्मीर_फाईल्स

🇮🇳 जय हिंद 🇮🇳